Sunday 21 December 2014


भारतातील प्राचिन सिंधू संस्कृतीचे जनक वा निर्माण करते. पशूपालक धनगर आहेत.

उत्खननात सापडलेली भांडी ,नाणी, शिल्प, यांवर चित्र पशूंची आहेत .
आर्यांच्या वारंवार झालेल्या आक्रमणातून सिंधू संस्कृतीचा -हास झाला असे अनेक इतिहासकार मानतात.
पशूपालन, शेती, व्यापार, व्यवसाय, अग्नीचा उपयोग, कुटूंब संस्था यासारख्या अनेक बाबी
वैदिक आर्य हे सिंधूजनांकडून शिकलेत. आर्यांचे प्रमुख्याने दोन कालखंड
पडतात. सुमारे इ.स. पूर्व १५०० ते इ.स.पूर्व १०००
हा वैदिकांचा पहिला कालखंड होय. तर इ.स. पूर्व १००० ते इ.स. पूर्व ६०० हा उत्तर वैदिक काळ
मानला जातो. युजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद (आयुर्वेद) या ग्रंथांची आर्यांनी निर्मिती केली.
वैदिकांच्या वाङमयाचे अवलोकन केले असता असे लक्षात येते की सिंधूजनांचे आर्यांनी केलेल्या अनुकरणाची छाप
वैदिकांच्या वाङमयावर पडलेली आहे. अथर्ववेदातील औषधी वनस्पतींचे गुणधर्म हे सिंधू
संस्कृतीतील पशूपालक धनगरांकडून मिळवलेले द्न्यान होय. वैदिकांनी हे द्न्यान ग्रंथ बद्ध केले एवढेच त्यांचे
श्रेय. कालांतराने वैदिक आर्यांनी त्यांच्याच लोकांची ब्राह्मण , क्षञिय , वैश्य असे तीन वर्णात
विभाजन केले.  १) ब्राम्हणांना वेदांचे व इतर द्न्यानाचे अध्ययन व अध्यापन (शिकणे व शिकवणे) तसेच धार्मिक
विधी करण्याचा अधिकार २)क्षञियांना द्न्यार्जन, राज्यकारभार व राज्य
रक्षणाचा अधिकार ३)वैश्यांना शेती, पशूपालन, व्यापार व उद्योग
करण्याचा अधिकार अशापद्धतीने स्वतःत कामाचे वाटप केले. कालांतराने सिंधुसंस्कृतीतील लोकांचा चौथा वर्ण
तयार केला . आणि त्यांना शूद्र (गुलाम) लेखले .या वर्णाला द्न्यानाचा (शिक्षणाचा) अधिकार
नाकारण्यात आला . हलकी सुलकी कामे करणे. वरील तिन्ही वर्णाची मनोभावे सेवा करणे एवढे गुलामीचे
जीवन त्यांच्या वाट्याला आले. वरील वर्णव्यवस्थेवर नजर टाकली असता असे लक्षात
येईल की सर्वोच्च स्थानी ब्राम्हण आहेत. याचाच अर्थ आजचे ब्राम्हण हेच आर्य आहेत. धनगर हे आर्य नव्हे. तर
चातुर्वण्यव्यवस्थेत धनगरांना शूद्र लेखलेले आहे. क्षञिय देखिल नव्हे.
धनगरांना वैदिकांची ही वर्ण व्यवस्था व धर्म अमान्य असल्यामुळेच त्यांनी नेहमीच आपले शूर वीरत्व दाखवून साम्राज्य व राज्य निर्माण केलेले आहे. अनार्य सिंधू जनांच्या दैनदिन जीवन पद्धतीचा बहूतांश
भागाचे अनुकरण वेदांमध्ये आर्यांनी समाविष्ट केलेले दिसते. सिंधू संस्कृतीतील उत्खननात अग्नीकुंड सापडलेले आहे.
सिंधूजन अग्निची पूजा करत. युजूर्वेदातील यद्न्याविषयीची माहिती व उच्चारले जाणारे मंञ हे
सिंधूजनांनचेच अनुकरण आहे. नंतर या यद्न्याचे स्वस्वर्थापाटी वैदिकांनी पशुबळी सारखे प्रकार करून
अतिरेकी स्तोम माजवले. ऋग्वेदात १० मंडले व १०२८ सक्ते आहेत. त्यात निसर्गातील विविध शक्तिंना देव मानून
त्यांची स्तुती गाणारी कवने आहेत. प्राचीन काळापासून तर आज देखिल पशुपालक धनगरांसह VJ, NT,
ST या समूहात देव -देवतांची स्तूती गाणारी अशी कवने गायली जातात. सिंधूजन हे निसर्ग देवतांचे पुजक होते हे
आपण या आधिच पाहिलेले आहे. सामवेदात गायन कलेविषयी विषयी विवेचन आहे. हे
सुद्धा सिंधूजनांकडून वैदिकांनी प्राप्त केलेले आहे. मूलतः गायन व नृत्य कला ही सिंधूजनांची आहे.
उत्खननात नर्तकीचा ब्रांजचा पुतळा मिळालेला आहे. वैदिकांचे हे वेद बरेच प्राचीन नसून उत्तर वैदिक
काळात वेदांच्या निर्मितीला प्रारंभ झाला व नंतर वारंवार त्यात अनेक वैदिक ऋषिंनी भर घातलेली आहे.
वैदिकांचे वेद, पुराण, रामायण, महाभारत , गीता यांसारखे यासारखे ब-याच मूळच्या वाङ्मयात
वारंवार भर घालून त्यास कसे फुगवण्यात आले हे संशोधकांनी सिद्ध केलेले आहे.
संस्कृत ही वैदिक आर्यांची भाषा आहे. संस्कृत ही भाषा भारतीय मूळनिवासियांच्या अनेक
बोली भाषेच्या संस्कारातून निर्माण झालेली आहे. म्हणून तिला संस्कृत म्हणतात. याच भाषेत
वैदिकांनी आपले वाङ्मय लिहिलेले आहे. वैदिकांच्या वाङ्मयातील फोलपणा शूद्र
लेखलेल्या सिंधूजनांच्या लक्षात येऊ नये या साठी शिक्षणाचा अधिकार नाकारला.
वैदिकांची वर्णव्यवस्था उलथून टाकू नये म्हणून शूद्रांना शस्ञ धारण करण्याचा अधिकार
वैदिकांनी नाकारला. वैदिकांच्या वर्णव्यवस्थेला सुरूंग लावल्या जाऊ नये
म्हणून त्याचा संबंध थेट ब्रम्ह देवाशी नेऊन भिडवला .ब्रह्माच्या तोंडातून ब्राम्हण, बाहूतून क्षञिय,
मांडितून वैश्य आणि पायातून शूद्र जन्मल्याचे वाङ्मयात रूढ करून वैदिकांनी त्यांच्या वाङ्मयाला अषौरुषेय
ठरविले. शास्ञाचा धाक दाखवून शूद्रांना मानसिक पंगू केले.
होमेश भुजाडे नागपू

Sunday 29 December 2013

भारताची पहिली महिला स्वातंञ्यसेनानी, स्ञी शौर्याची महानायिका भीमाई होळकर

भारताची पहिली महिला स्वातंञ्यसेनानी, स्ञी शौर्याची महानायिका जिचा जन्म होळकर राजवंशात झाला .भारताचे प्रथम स्वातंञ्यवीर राजे यशवंत (प्रथम) यांची ही एकूलती एक कन्या भीमाई होय.
या भिमाईने ब्रिटीशांविरूद्ध दिलेल्या लढ्याला इतिहासात तोड नाही.
भिमाईचा पराक्रम झाशीच्या लक्ष्मीबाईच्या ४० वर्ष आधीचा आहे. परंतु या शूरवीर रणरागिणीच्या देशभक्तीकडे, जाज्वल्य इतीहासाकडे आणि तिच्या शौर्यगाथेकडे इतिहासकारांनी कसेकाय दूर्लक्ष केले ?
होळकर राजवंशात होऊन गेलेल्या चौदा नर -नारी रत्नांनी २२० वर्ष अप्रतीम असा राज्यकारभार केला केवळ व्यापार समृद्धीच्या दृष्टीकोनातूनच नव्हे, तर इंग्रजांच्या घुसखोरी पासुन देखील होळकर राज्याच्या चतुर्सिमा सुरक्षीत राहिल्यात . मध्यप्रदेशातील इंदोर स्थित होळकरांचे राज्य सहजासहजी इंग्रजांना गिळंकृत करता आले नाही. हेच त्यांच्या देशभक्तीचे धोतक आहे.भीमाईने रणांगणावर बलाढ्य ब्रिटीश सेनेची उडविलेली दाणादाण , त्यांचा अनेकदा केलेला पराभव , वेळोवेळी भीमाने दाखविलेला मुत्सदीपणा , रणसंग्रामाचेवेळी दाखविलेली वीरता , इंग्रज सेनेचे पाडलेले मुडदे यांमुळे इंग्रज प्रचंड दुखावलेले होते. भीमाईला धडा शिकवण्यासाठी ब्रिटीश योग्य संधीची वाट बघत होते.
एकदा भीमाईला पकडण्यासाठी इंग्रजांनी प्रचंड मोठा सैन्यांचा घेरा घातला. ब्रिटीश कर्नल माल्कमच्या योजनाबद्ध घेरावास भीमाई न्याहळत होत्या. जेव्हा घेराव अतिशय जवळ आला तेव्हा भीमाईने घोड्याची लगाम जोरात ओढली. पायाची टाच मारली. घोड्याचे दोन्ही पाय भीमाच्या डोक्यावर उसळले . माल्कम स्वतःचा बचाव करण्यासाठी विचलीत होत नाही तोच भीमाईच्या घोड्याने मोठी उडी मारली आणि घेरावाच्या पलीकडे भीमाईने घोडा उडविला. क्षणभर माल्कमला काय करावे काहीच सुचले नाही. तोपर्यंत भीमाई प्रचंड वेगाने घोडा पळवत जंगलात अदृश्य झाली. भीमाईला जिवंत पकडण्याचे स्वप्न पाहणारा माल्कम हतबल होऊन केवळ बघतच राहिला.
" वीर शेरनी लडनेवाली ,
रण से हूई सगाई थी ।
खूब लडी मर्दानी रणमें ,
वह तो इंदोर की भीमाई थी ।। "

अनेकदा रणांगणावर माल्कमला मात देऊन चकमा देणारी भीमाई जंगलात द-याखो-यात आश्रय घेत असे. गुप्तपणे गनिमी काव्याचे युद्ध तंञ वापरून ब्रिटीशांच्या शस्ञगारावर, खजीन्यवर , पोलीसठाण्यावर , सैन्य छावणीवर , धान्याच्या गोदामावर अचानक हल्ला करून त्यास लुटत असे यामध्ये आडकाठी बनणा-या इंग्रज सैन्यांना कापून पसार होत असे.
ज्या पद्धतिने गनिमी काव्याचा युद्ध तंञाने लढून छ.शिवराय व राजर्षी मल्हारबा यांनी शञूंना नामोहरम केले. अगदी तसेच शिवमल्हार तंञ वापरून भीमाईने इंग्रजांना नामोहरम केले .

१८१७ चे महिदपूरचे युद्ध
-------------------------------
महाराज यशवंत (प्रथम) याच्या मृत्यूनंतर होळकर संस्थानाच्या राजपदाची सूञं केशरबाईच्या ( कृष्णाबाई) पोटी जन्मलेला मल्हारराव ( द्वितीय) यांना रितसर देण्यात आलीत. अल्पवयीन मल्हारराव राजे जरी असले तरी शासन - प्रशासनातील बहूतांशी निर्णय केशरबाई व भीमाईच घेत असे . अशातच २० डिसेंबर १८१७ चे ब्रिटीशांविरूद्ध होळकरांचे युद्ध हे भारतीय इतिहासातील एक अविस्मरणीय घटना आहे.
भीमाईकडे २५०० छापामारीत प्रवीण असणारे घोडेस्वार होते. याशिवाय ८० तोफा , ३००० घोडदळ, ३०, ००० पायदळ तलवार एवं बंदुकांनी सज्ज होते.
इंग्रज पूर्ण तयारीनीशी होळकर संस्थान गिळंकृत करण्याच्या उद्देशाने इंदोरवर आक्रमणा करणार असल्याची सुचना राजदरबारात येऊन धडकली . लगेच भीमाईने यद्धची तयारी सुरू केली.
कॅप्टन टॉड, रायन, विकर्स या ब्रिटीश योद्ध्यांकडून प्रशिक्षण प्राप्त इंग्रज सेना महिदपूर गावच्या सिमेजवळ येऊन पोहचली .ब्रिटीश सेनेचा प्रचंड जमावडा सुरू झाला.
देशभक्ती रोमारोमात संचारलेल्या होळकर सेनेने ब्रिटीश सेनेवर प्रचंड आक्रमण केले . भीषण युद्धाला प्रारंभ झाला. वीस वर्षीय भीमाई भुकेल्या शेरणी सारखी दाहडत इंग्रज सेनेवर तूटून पडली . भीमाई अभूतपूर्व सैन्य संचलन, शस्ञ संचलन व युद्ध संचलन करून सेनेत जोश भरत होती.

ब्रिटीश सेनेचे नेतृत्व प्रचंड अनुभवी व भारतात दरारा असलेल्या कर्नल माल्कम, कमांडर टॉम्स हिस्लाप आणि मेजर हंट यांच्याकडे होते. भिषण युद्धाला प्रारंभ झाला. २० वर्षीय भीमाई, १२ वर्षीय राजे मल्हारराव, २० वर्षीय हरिराव (विठोजींचा मुलगा) हे बालक होळकर सेनेचे नेतृत्व करत होते. या बालवीरांच्या नेतृत्वात होळकर सेना ब्रिटीश सेनेवर तुटून पडली.
राजे मल्हारराव हत्तीवर बसून लढाई करत सैनिकांचे मनोधैर्य व आत्मविश्वास वाढवत होते.
भीमाईने घोड्याची लगाम दातात धरली . दोन हातात दोन तलवार घेऊन अक्षरशः ब्रिटीश सैन्यांना कापून काढत होती. भीमाईच्या शौर्याचा संदेश एका ब्रिटीश सैनिकाने मेजर हंटला कळविला . तो एकून आश्चर्यचकीत झाला. आणि लगेच भीमाईच्या दिशेने यायला लागला. विजेसमान कडाडत आणि शेरणीसारखी दाहडत भीमाई ब्रिटीश सैन्याचे मुडदे पाडतांना पाहून युद्धाचा प्रचंड अनुभव असणा-या मेजर हंटची पाचावर धारणा बसली.
मेजर हंट सैन्य तुकडीसह आपल्याकडे येतांना पाहून सिंहगर्जना करत अश्वरूढ भीमाई प्रचंड वेगाने हंटच्या दिशेने निघाली. क्षणार्धात तलवारीने हंटवर वार केला. हंटने कसाबसा तो वार बचावण्याचा प्रयत्न केला. हातातली तलवार बाजूला पडली. रक्तबंबाळ अवस्थेत जखमी झालेला हंट स्तब्ध होऊन केविलवाण्या नजरेने भीमाईकडे पाहू लागला.
हे फिरंग्या मी निशस्ञावर वार करत नाही. बघतोस काय ? ऊठ आणि युद्धाला तयार हो ! नाही तर जा आपल्या जखमेवर उपचार करून घे !
शेवटी तहाने युद्धाचा शेवट जरी झाला असला तरी बलाढ्य ब्रिटीश सैन्याची एका धनगराच्या मुलीने अशी दाणादाण उडवणे ही गोष्ट खरोखरच भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे.


होमेश भुजाडे नागपूर 9422803273


महाराजा तुकोजीराव होळकर -III –


बहुजन्नाचा वीर राजा (जन्म : 26 नवम्बर 1890, देहान्त 21 मई 1978 ) छत्रपति शिवाजी महाराजांचे चरित्र तत्कालीन रु २४,०००/- खर्च करूंन... जगातील सर्व भाषांमधे प्रकाशित करून विश्वभर मोफत पोहोचाविले. राजश्री शाहू यांचे निधन १९२२ साली झाले अणि रायातेने अपाला पुरोगामी राजा गमवला यातून जातीय वाद पुन्हा उफलला यावर कायमस्वरूपी उपाय महाराजा तुकोजीराव होळकर यांनी काढला अणि आपला मुलगा यशवतराव होलकर-II याचा विवाह शाहूराजांच्या चुलत बहिनिशी १९२४ रोजी करवून घेतला .असाच प्रकारे अनकहीं १०० अंतरजातीय विवाह करवून दिले अणि एक पुरोगामी चलवल सुरु झाली या सर्व गोस्टिचा परिणाम गुलामगिरीत रहनारा भारतीय समाज छात्रपतिंच्या शौर्य आणी महाराजा होळकर यांचा उघडपणे जाहिर पाठिंबा यामुल़े स्पृतित होऊन इंग्रजांच्या विरोधात बंड करून पेटून उठला . जनतेचा वधता रोष हा महाराजा होळकर यांच्या जाहिर पाठिंबा यामुल़े आहे म्हणून त्यांना राजगादी सोडावी नाहीतर शिव स्मृति जगावान्याचे कार्य बंद करावे या साठी इंग्रज हुकूमत दबाव अणु लागली.. मोडेन पण वाकणार नहीं . महापराक्रमी आद्या क्रांतिनायक महाराजा यशवंतराजे होळकर यानचा सार्थ वारस असलेले महाराजा तुकोजीराव होळकर (III) यांनी स्वतःहा हून राजगादी १९२६ मधे सोडली .. तरीही कार्य महाराजा होळकर यांनी व्यापक स्वरूपात करने सुरूच ठेवले महाराजा तुकोजीराव होळकर (III) यांनी स्वतःहाच्या पैशातून तत्कालीन रु ५,००,०००/- जगातील पहिला शिवाजी महाराजांचा पुतला पुणे (शिवाजीनगर) येथे १९३२ साली बसवला .. रायगडावारिल शिवाजी महाराजांचा सिंव्हासन रुढ़ पुतला अणि शिवाजी महाराजांच्या प्रिय वाघ्याची स्मृति तत्कालीन रु ५,०००/- खर्च करून १९३६ साली उभारली महाराजा तुकोजीराव होळकर (III) यांच्या चरनी माझे नमन.

Monday 16 December 2013

"सर्वसामान्य बहुजन समाजाला गुलामगिरीच्या दलदलीतून बाहेर काढून स्वाभिमानाचे नवे जीवन देणाऱ्या काही मोजक्या समाजसुधारकांमध्ये राजर्षी शाहूंचा समावेश होतो. राजर्षी शाहू आणि इतर समाज सुधारक यांच्यात महत्वाचा फरक म्हणजे राजर्षी शाहुंकडे राजसत्ता होती. त्याआधारे ते बहुजन समाजाच्या हिताचे निर्णय राबवू शकत होते.त्यासाठी त्यांना दुसऱ्यांची मनधरणी करावी लागली नाही.राजर्षी शाहू हे प्रजावत्सल, दलितबंधू, समतेचे पुरस्कर्ते आणि निधड्या छातीचे कर्ते समाजसुधारक होते."
शाहू राजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव व आईचे नाव राधाबाई होते. शाहूंचे बालपणीचे नाव यशवंतराव होते. १७ मार्च १८८४ रोजी शाहूंचे दत्तकविधान व राज्यारोहण झाले. यशवंतरावाचे दत्तकविधानानंतर ‘शाहू महाराज’ असे नामकरण झाले. शाहूंनी आपल्या आयुष्यात जातीभेद निर्मुलन, अस्पृश्यता निवारण, स्त्रियांचा उद्धार, बहुजनांचा शैक्षणिक विकास, औद्योगिक प्रगती, शेतीचा विकास, धरणे, रस्ते ई. क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावली. आपली राजसत्ता खऱ्या अर्थाने उपेक्षित, वंचित समाजासाठी वापरली. त्यामुळे शाहू हे लोकांचे राजे झाले.



आरक्षणाचे प्रणेते-
मागासलेल्या वर्गाना प्रगतीच्या प्रवाहात आणायचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे, अशी कल्पना महात्मा जोतिबा फुले यांनी मांडली.राजर्षी शाहूंनी आपल्या अधिकारांचा वापर करून ही कल्पना प्रत्यक्षात उतरवली. ६ जुलै १९०२ रोजी त्यांनी कोल्हापूर संस्थानात मागास जातींना ५० % जागा राखीव राहतील अशी घोषणा केली. त्याची त्वरित अंमलबजावणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून रिपोर्ट मागविले. शाहूंच्या या निर्णयाला तेव्हा सामाजिक कार्यकर्ते म्हणवणाऱ्या अनेक उच्चवर्णीय पुढाऱ्यांनी विरोध केला. शाहुंवर अनेक प्रकारचे आरोप केले. परंतु वंचितांच्या विकासाचे व्रत घेतलेल्या शाहूंनी कशाचीही पर्वा न करता आपले धोरण चालू ठेवले.

तथाकथित गुन्हेगार जातींविषयी भूमिका-
जातव्यवस्थेची शिकार झालेल्या अनेक जमाती त्या काळात चोऱ्या, दरोडे अशा चुकीच्या मार्गांचा अवलंब करत होत्या. सनातनी वर्णव्यवस्थेने त्यांना उपेक्षित ठेवून शिक्षण, सत्ता व संपत्तीचा अधिकार नाकारला. परिणामी त्यांची सर्वच क्षेत्रात अधोगती झाली. त्यांचा सामाजिक दर्जा खालावला. समाजाकडून मिळणारी अन्याय्य वागणूक व उत्पन्नाचे काहीच साधन नाही अशा दुहेरी संकटात सापडलेल्या मागास, भटक्या जमातीतील अनेक लोकांनी पोटापाण्यासाठी चोऱ्या, दरोडे अशा गोष्टींचा आधार घेतला. तत्कालीन ब्रिटीश सरकारने या जमातीवर गुन्हेगारीचा शिक्का मारला. त्यांना रोज गावकामगाराकडे हजेरी लावावी लागत असे. शाहुराजांना या लोकांची कणव होती. शाहू खऱ्या अर्थाने वंचितांचे राजे होते. त्यामुळे शाहूंनी ही हजेरी पद्धत बंद केली. या जाती-जमातीतील लोकांना संघटीत करून गुन्हेगारी कृत्यांपासून परावृत्त केले. त्यांना नोकऱ्या दिल्या. त्यांच्यातून पहारेकरी, रखवालदार नेमले, रथावर वाहक नेमले. त्यांना घरे बांधून दिली. राहण्याची व पोटापाण्याची सोय झाली. शाहुराजांचे प्रेम मिळाले. त्यामुळे या लोकांनी गुन्हेगारी कारवाया सोडून देवून ‘माणूस’ म्हणून जगायला सुरुवात केली. गुन्हेगारांना शासन करणारा सत्ताधीश सर्वत्र पहायला मिळेल. मात्र त्यांना प्रेमाने, मायेने आपलेसे करून समान सामाजिक दर्जा देणारा व त्यांच्यात स्वाभिमान निर्माण करणारा राजा विरळाच.

राजर्षी शाहू आणि स्त्रियांची स्थिती-
धर्मव्यवस्थेने स्त्रियांनाही अतिशय उपेक्षित ठेवले. त्यांचे हक्क-अधिकार नाकारले. स्त्रियांवर अनेक बंधने लादली.त्यामुळे स्त्रियांची एकंदर सामाजिक अधोगती झाली होती. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांना दुय्यम स्थान प्राप्त झाले होते. त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागे. स्त्रियांना कुणीही वाली उरला नव्हता. स्त्रियांची ही अवनती जाणून शाहू राजांनी त्यांच्या उन्नतीसाठी विशेष प्रयत्न केले. स्त्रियांसाठी अनेक चांगले कायदे केले. धर्माच्या नावाखाली देवांना मुले-मुली वाहण्याची अनैतिक पद्धत संस्थानात चालू होती. महाराजांनी जोगत्या-मुरळी प्रतिबंधक कायदा करून ही अमानुष पद्धत बंद केली. जातीभेदाचे प्रस्थ नष्ट व्हावे म्हणून संस्थानात आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाहास कायदेशीर मान्यता दिली. तसा कायदा केला. आपल्या चुलत बहिणीचे लग्न धनगर समाजातील यशवंतराव होळकर यांच्याशी लावून दिले. तसेच त्या काळात संस्थानात शंभर मराठा-धनगर विवाह घडवून आणले. विधवांची दारूण परिस्थिती लक्षात घेवून पुनर्विवाह नोंदणीसंबंधी कायदा केला. त्यामुळे विधवांच्या परिस्थितीत बराच फरक पडला. त्यांना कायद्याने पुनर्विवाह करता येवू लागला. संस्थानातील अनेक समाजात ‘काडीमोड’संबंधी त्या-त्या जात-पंचायतींचे आपापले कायदे असत. हे कायदे पुरुषप्रधान संस्कृतीला साजेसे म्हणजेच पुरुषांना अनुकूल तर स्त्रियांना प्रतिकूल असत. त्यामुळे स्त्रियांवर नेहमी अन्याय होई. स्त्रियांच्या मतांना आणि भावनांना फारशी किंमत नव्हती. त्यामुळे स्त्रियांची कुचंबना होई. हे ओळखून शाहू महाराजांनी संस्थानात ‘काडीमोड’संबंधी कायदा केला. अशा प्रकारचे खटले रीतसर कोर्टात चालवण्याचे आदेश दिले. स्त्रियांवर अन्याय होऊ नये म्हणून त्यांनाही ‘काडीमोड’ घेण्याचे अधिकार दिले. स्त्रियांना क्रूरपणे वागवण्याच्या पद्धतीविरुद्धही शाहू राजांनी कायदा केला.स्त्रियांचा शारीरिक व मानसिक छळ करणे, त्यांना उपाशी ठेवणे, मारहाण करणे अशा प्रकारच्या गुन्ह्यांसाठी कडक शिक्षा केल्या. त्यामुळे स्त्रियांना मोठा आधार मिळाला. राजर्षी शाहूंनी केलेल्या या अनेक स्त्री-उद्धारक कायद्यांमुळे स्त्रियांना सामाजिक प्रवाहात येण्यासाठी खूप मदत झाली.

राजर्षी शाहूंचे शैक्षणिक कार्य-
तत्कालीन वर्ण-व्यवस्थेने शूद्र आणि सर्व स्त्रिया यांना शिक्षणाचा अधिकार नाकारून त्यांच्यावर अन्याय केला. महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीमाई यांनी दलित-बहुजनांसाठी आणि स्त्रियांसाठी शाळा काढल्या. तोच वारसा जपत शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात बहुजन समाजाच्या शैक्षणिक विकासाच्या अनुषंगाने मोलाची कामगिरी बजावली. महाराजांनी १९१७ साली कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा केला. हा कायदा करताना महाराजांनी पालकांनाही दंड ठेवला. जर एखाद्या पालकाचा मुलगा शाळेत आला नाही तर दरमहा १ रु. दंड ठेवला. शाहूंनी प्राथमिक शिक्षणावर भर दिला. कारण पाया पक्का असेल तरच माणसाची भावी शैक्षणिक प्रगती होऊ शकेल असे महाराजांचे मत होते.ते म्हणत, “शिक्षणानेच आमचा तरणोपाय आहे असे माझे ठाम मत आहे. शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झाली नाही, असे इतिहास सांगतो.” शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या अनेक अडचणी समजावून घेवून महाराजांनी त्यावर उपाय केले. मागास, गरीब विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप व इतर सवलती दिल्या. विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतीगृहे बांधली. कोल्हापुरात हायस्कूल व कॉलेजची स्थापना केली. राजाराम कॉलेज मध्ये मुलींची फी माफ केली. त्याकाळी काही शिक्षक अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजातील काही मुलांना व्हरांड्यात बसवत असत. ही गोष्ट महाराजांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शिक्षकांना जरब बसेल असे उपाय केले. सरकारी शाळेत शिवाशिव पळू नये व सर्व जाती-धर्माच्या विद्यार्थ्यांना एकत्र बसवावे असा वटहुकूम काढला. ज्या शाळा या हुकुमाचे पालन करणार नाहीत त्यांची ग्रांट व इतर सवलती बंद करण्याची तंबी दिली.

वेदोक्त प्रकरण-
शाहू महाराजांच्या जीवनाला कलाटणी देणारा सर्वात महत्वाचा प्रसंग म्हणजे वेदोक्त प्रकरण होय. शाहू महाराजांचा भटजी राजोपाध्ये यांनी महाराजांना शूद्र मानून त्यांचे विधी वैदिक मंत्राने न करता पुराणोक्त मंत्राने करणार अशी भूमिका घेतली. त्यामुळे महाराज दुखावले गेले. अनेक प्रकारे समाज देवूनही भटजी त्याची भूमिका सोडत नाही असे दिसताच महाराजांनी त्याचे इनाम जप्त केले. परिणामी वाद अधिकच चिघळला. टिळकांनीही केसरीमध्ये अग्रलेख लिहून सामाजिक न्यायाची बाजू न घेता भटजीची बाजू घेतली. आधीच महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीमुळे ब्राम्हण-ब्राम्हणेतर वाद धुमसत होता.त्यात टिळक आणि महाराष्ट्रातील बहुतांशी ब्राम्हण महाराजांच्या विरोधात एकवटल्यामुळे ब्राम्हणेतर समाजही महाराजांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. परिणामी महाराष्ट्रात ब्राम्हण आणि ब्राम्हणेतर असे दोन गट पडले. ब्राम्हणांचे नेतृत्व टिळकांकडे तर ब्राम्हणेतरांचे नेते शाहू महाराज. परिणामी टिळक आणि शाहू राजे यांच्यात वितुष्ट निर्माण झाले. खरेतर शाहू महाराजांचे भांडण ब्राम्हणांविरुद्ध नव्हते तर त्यांच्या वर्चस्ववादी मानसिकतेविरुद्ध होते.विधी वैदिक मंत्राने केले काय किंवा पुराणोक्त मंत्राने केले काय ? काहीच फरक पडत नाही हे शाहू राजे जाणत होते. परंतु बहुजनांचे विधी वैदिक पद्धतीने न करण्यामागे ब्राम्हणांचा वर्णवर्चस्ववाद असल्याने शाहुनीही आपली भूमिका सोडली नाही. या घटनेनंतर शाहू राजांनी सामाजिक न्यायाच्या लढाईला अधिक बळकटी मिळवून दिली.

शाहू महाराजांचे आर्थिक धोरण-
शाहू महाराजांनी उद्योगधंदे उभारण्याच्या दृष्टीने खास प्रयत्न केले.कारागिरांना आश्रय दिला. आपल्या संस्थानात सुत गिरणी चालू केली.त्यासाठी मोठी जमीन मोफत दिली. इचलकरंजी येथे जिनिंग कारखाना सुरु केला. त्यानंतर इतर ठिकाणी अशा प्रकारचे कारखाने सुरु केले. उद्योगधंदे आणि व्यापार वाढीसाठी शाहूंनी कारागिरांना अनेक प्रकारच्या सवलती दिल्या. त्यांना राहण्यासाठी जमिनी दिल्या. बिनव्याजी कर्जे दिली. पाणीपुरवठ्याची मोफत सोय केली. रस्ते बांधले, रेल्वेच्या विकासास गती दिली. १८९५ साली शाहूपुरी ही व्यापारपेठ वसवण्यात आली.

राजर्षी शाहूंचा वारसा-
आज शाहू महाराजांचे काम बहुतांशी लोकांपर्यंत पोहचले आहे. शाहुराजांच्या या अद्वितीय कामगिरीमुळे सर्वसामान्य बहुजनांच्या हृदयात शाहूंना आदराचे स्थान आहे. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या युगपुरुषांच्या जोडीला शाहू राजांचे नाव घेतले जाते. पुरोगामी महाराष्ट्र घडवण्यात फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचा फार मोठा वाटा आहे.
आज शाहू महाराजांच्या जयंत्या-पुण्यतिथ्या सर्वत्र साजऱ्या केल्या जातात. परंतु फक्त एवढे करून त्यांच्या विचार-कार्याचे चीज होणार नाही. शाहूंचा लढा हा समतेसाठी होता. आत्मसन्मानासाठी होता. वर्णवर्चस्वाच्या अहंकारी प्रवृत्तीविरुद्ध होता. आज शाहू राजांच्या पश्चात त्यांचाच जयजयकार करणारे, त्यांच्या नावाने सत्ता भोगणारे राज्यकर्ते गरीब प्रजेला छळत आहेत. भ्रष्टाचार, गुंडगिरी या प्रवृत्ती फोफावल्या आहेत. शाहूराजे फक्त पुजण्यापुरतेच राहिले आहेत. त्यांचा वारसा, त्यांचे विचार, कार्य आपण विसरलो आहोत. राजर्षी शाहूंनी प्रतिकूल परिस्थितीत आपल्या संस्थानात जनहितार्थ अनेक कायदे केले. प्रसंगी टीका, अपमान, बदनामी यांची पर्वा केली नाही. पण आजच्या राज्यकर्त्यांना ‘जादूटोणा व अघोरी प्रथाविरुद्ध कायदा’ करता येत नाही. राज्यकर्ते शाहूंच्या नावाने राजकारण करतात मात्र त्यांचा विचार जपताना कुणीच दिसत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे.


शाहूंच्या कार्याचे खरे चीज व्हावे असे वाटत असेल तर शिक्षण घेवून उच्च पदे हस्तगत केली पाहिजेत. आपल्या अधिकाराचा, पदाचा वापर सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाकरता केला पाहिजे. उपेक्षित, वंचितांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, जातीभेद नष्ट करणे, सामाजिक समता प्रस्थापित करणे ही शाहू राजांची अपूर्ण राहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करुया, हीच शाहुराजांना आदरांजली ठरेल.

पुतळ्यावरून वाद चालू आहे. इतिहासाची ..........

पुतळ्यावरून वाद चालू आहे. इतिहासाची पुनर्मांडणी करताना ऐतिहासिक घटना, पात्रे यांच्या सत्यासत्यतेवरून वाद निर्माण होणे साहजिक आहे. ऐतिहासिक पुराव्याच्या आधारे जर कोणी मांडणी करत असेल तर तो भाग स्वीकारायला हरकत नाही. परंतु इथे प्रश्न आहे तो वाघ्या कुत्र्याचा. असा कुत्रा इतिहासात होवून गेला का नाही यावर बराच खल चालू आहे. हा वाघ्याचा पुतळा तुकोजीराव होळकरांच्या देणगीतून निर्माण झाल्यामुळे धनगर समाज्याच्या या पुतळ्याबद्दल अत्यंत पूज्य भावना आहेत. त्यामुळे संभाजी ब्रिगेडने वाघ्याचा पुतळा उध्वस्त करण्याची घोषणा केल्यापासून धनगर समाज आणि त्यांचे नेते अस्वस्थ झाले आहेत. धनगर समाजाच्या या अस्वस्थतेतून त्यांनी संभाजी ब्रिगेडच्या या भूमिकेला विरोध केला आहे. ऐतिहासिक पुराव्याच्या आधारे जे सिद्ध होईल ते सत्य सर्वांनाच स्वीकारावे लागेल. परंतु संभाजी ब्रिगेडने पुतळा उध्वस्त न करता धनगर समाजाशी चर्चा करून विश्वासाने हा प्रश्न सोडवावा. नाहीतर मराठा विरुद्ध धनगर असा संघर्ष उभा राहायला वेळ लागणार नाही. आणि तसे झाले तर बहुजन चळवळीची हानी होईल. वाघ्या कुत्र्याच्या पार्श्वभूमीवर धनगर समाजातील अग्रणी नेते श्री. रामभाऊ वडकुते झारगड मामा यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. ती सर्वांच्या माहितीसाठी सह्याद्री बाणा वर उपलब्ध आहे.
- प्रकाश पोळ 
रायगड किल्ल्यावरील शिवस्मारकासमोरील वाघ्या कुत्र्याचे स्मारक हटवण्याचा घाट संभाजी ब्रिगेडने घातला आहे. केवळ शिवचरित्रात वाघ्य्याच्या आस्तित्वाचे लिखित पुरावे सापडत नाहीत म्हणुन वाघ्याचे उच्चाटन करण्याचे त्यांचे हे प्रयत्न अत्यंत निंदनीय असून त्याचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत असे पत्रक धनगर समाजातील अग्रणी नेते श्री. रामभाऊ वडकुते व झारगड मामा यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

दंतकथा म्हणजे इतिहास नव्हे हे खरे असले तरी दंतकथांना सत्याच्या बीजाचा आधार असतो. सुप्रसिद्ध नाटककार राम गणेश गडकरीं यांनी केवळ कल्पनेच्या जोरावर वाघ्याचे पात्र निर्माण केले असा युक्तिवाद संभाजी ब्रिगेड करत आहे तो ग्राह्य धरता येणार नाही. दुसरे असे कि ज्या जागेवर हे स्मारक उभारले गेले आहे तेथे पुर्वी एक उद्ध्वस्त चौथरा होता. तो चौथरा शिवाजी महाराजांच्या कोणा राणीचे असल्याचाही उल्लेख इतिहासात नाही किंवा तशी दंतकथाही नाही.  अशा स्थितीत वाघ्याचा वाद पेटवून त्यावर राजकारण करून समाज-स्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही. बहुजन समाजामद्धे फुट पाडण्याची ही राजकीय चाल हाणुन पाडली जाईल असा इशारा त्यांनी या पत्रकात दिला आहे.

निधीअभावी  ज्यावेळी शिवस्मारकाचे काम अडुन पडले होते त्यावेळी मदत करायला पुढे सरसावले ते शिवप्रेमी तुकोजी महाराज.ही सर्वात महत्वाची बाब आज मुद्दाम दडवली जात आहे. शिवस्मारकासाठी एकमेव मोठी देणगी तुकोजीमहाराजांची आहे आणि त्या काळी त्यांनी शिवस्मारकाला रु. ५०००/- ची देणगी दिली. ही देणगी मागायला पुण्यातुन श्री. जी.व्ही. काळे आणि श्री ग.वि. केतकर इंदोरला गेले होते. त्याच वेळी  तुकोजीरावांच्या लाडक्या कुत्राचाही दुर्दैवाने म्रुत्यु झाला होता. तुकोजीराव दु:खात होते. त्यानिमित्ताने शिवाजी महाराजांच्या लाडक्या कुत्र्याचेही स्मरण रहावे आणि स्वामीनिष्ठेचा गौरव केला जावा या दुहेरी हेतुने वाघ्या कुत्राचे स्मारक करण्याचे ठरवले गेले. त्यानुसार स्मारक समितीने शिवस्मारक पुर्ण झाल्यानंतर त्वरीत आदरपुर्वक वाघ्याचे स्मारक बनवले. हे स्मारक तुकोजीराजांच्या देणगीतुन झाले आहे असा स्पष्ट उल्लेख त्या स्मारकावर शिलालेखात आहे. म्हणजे या स्मारकावर पहिला हक्क होळकर घराण्याचा आहे. हे लक्षात न घेता झुंडशाहीने हे स्मारक हटवण्याची भाषा करणे निषेधार्ह आहे.

धनगर समाजासाठी कुत्रा हा दैवतासमान आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबाचा लाडका कुत्रा वाघ्या हाच आहे आणि त्याची पुजा केली जाते. तुकोजीराव हे धनगर समाजातले होते त्यामुळे त्यांना वाघ्याबद्दल आत्मीयता आणी पुज्यभाव असणे स्वाभाविक आहे. जर तुकोजीरावांना आपल्या कुत्र्याचे स्मारक बनवायचे असते तर त्यांनी त्याचेच नाव स्मारकाला दिले असते. परंतु त्यांनी ते शिवरायांच्या वाघ्याचे स्मारक बनवले, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

अशा स्थीतित वाघ्याचे स्मारक हटवण्याचा प्रयत्न केल्यास तो सर्व धनगर समाजाचा आणि समग्र ओ.बी.सी, भटके विमुक्त व तमाम शिवप्रेमींचा अवमान मानून त्याचा हे सर्व जण प्राणपणाने विरोध करतील असा इशारा आम्ही देत आहोत.

मराठा समाजातील इतिहासकार क्रुष्णाजी अर्जुन केळुस्कर यांनी १९०६ साली विस्त्रूत शिवचरित्र प्रकाशित केले. त्याच्या इंग्रजी, गुजराती व हिंदी अनुवादाचे खंड प्रकाशित करतांना त्यांना फार मोठे कर्ज झाले. "इतक्यात इंदोरचे उदार अधिपती श्रीमंत सवाई तुकोजीराव होळकर महाराजांच्या कानी क्रुष्णरावांची करुण कहानी गेली. खरोखर त्या काळात क्रुष्णरावांची स्थीति अत्यंत करुणाजनक झालेली होती. इतक्यात इंदोरापधीतिंची २४००० रुपयांची (आजचे सुमारे रु. ६० लाख) उदार देणगी देवून जगातील प्रमुख इंग्रजी ग्रंथालयांस फुकट वाटण्यासाठी इंग्रजी चरित्राच्या ४००० प्रती त्यांनी घेतल्या व त्या मुळ उद्देशानुरुप प्रमुख ग्रंथालयातुन ठेवण्याची व्यवस्था केली. अशा रीतिने क्रुष्णरावजी व्रुद्धापकाळी एका मोटःया काळजीतुन मुक्त झाले." (पहा-छत्रपती शिवाजी महाराज...ले. क्रुष्णाजी अर्जुन केळुस्कर, {प्रथमाव्रुत्ती...१९०६} ४थी आव्रुत्ती, वरदा प्रकाशन, पुणे-१६, प्रुष्ट क्र. नउ)

म्हणजे शिवचरित्र आणि शिवस्मारक या दोन्हींसाठी शिवप्रेमाने प्रेरीत होवून जे तुकोजीराजे पुढे आले त्यांचा अवमान करण्यासाठीच हा वाघ्याच्झा पुतळा काढुन टाकण्याची मागणी पुढे आली आहे हे लक्षात घेउन समग्र शिवप्रेमींनी याचा प्रतिकार केला पाहिजे. वाघ्याच्या पुतळ्याला हात जरी लावला गेला तर आम्ही तीव्र आंदोलन छेडुन महाराष्ट्र पेटवू असा इशाराही या पत्रकात देण्यात आला आहे.

या भारतभूमीत आपल्या प्राणांची बाजी लावून देशासाठी......

या भारतभूमीत आपल्या प्राणांची बाजी लावून देशासाठी लढणारे अनेक वीर जन्माला आले. आपल्या तळपत्या कर्तुत्वाने त्यांनी दाहीदिशा उजळून टाकल्या. परंतु त्यांच्या पश्चात त्यांचा इतिहास लिहिणाऱ्या बहुतांश इतिहासकारांनी प्रामाणिक इतिहास लिहिला नाही. खोट्या कथा, काल्पनिक प्रसंग, पात्रे यांची घुसावाघुसव करत अनेक महामानावांचा इतिहास बिघडवून टाकला. या महापुरुषांना आणि महान स्त्रियांना 
जातीच्या चष्म्यातून पाहत त्यांचा विकृत इतिहास लिहिला. मल्हारराव होळकर या सामान्य धनगराच्या मुलाने स्वकर्तुत्वावर मोठे राज्य निर्माण केले. अहिल्यामाई होळकर यांनी आपल्या लोककल्याणकारी कामाने संपूर्ण भारतभर आदर्श राज्य कसे असावे याचा वस्तुपाठ घालून दिला आहे. अहिल्यामाई होळकर यांचे पती खंडेराव हे युद्धात मरण पावले. युद्ध करता करता मरण येवूनही खंडेराव यांना बदनाम केले. खंडेराव व अहिल्यामाई यांचे पुत्र मालेराव हे व्यसनी, माथेफिरू रेखाटले. तुकोजी होळकर, यशवंतराव होळकर यानीही आपल्या कार्याने सर्वांना प्रेरित केले आहे. या देशातील  क्रांतिकारक आणि अखेरचा सार्वभौम राजा असणारा यशवंतराव होळकर याच्या बलिदानाची काडीमात्र पर्वा न करता त्यालाही माथेफिरू रेखाटले. जणू काय होळकरांच्या खानदानालाच माथेफिरू बनण्याचा शाप होता.  होळकर घराण्यातील अनेकांनी सामान्य लोकांसाठी आपले आयुष्य खर्ची घातले. तरीही त्यांच्या पदरी उपेक्षाच आली. 


एक अहिल्यामाई यांचे नाव घेण्यापुरतेच होळकरांचे कर्तुत्व आहे असे सर्वांना वाटते. तसा समज जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आला आहे. खंडेराव, मालेराव, तुकोजी, यशवंतराव, विठोजी होळकर यांचा संघर्ष समाजासमोर आलाच नाही. स्त्रिया पुरुषांपेक्षा कमी नाहीत हे सांगताना आम्ही गल्लीपासून दिल्लीपर्यंत शेकडो उदाहरणे देतो, परंतु आम्हाला क्रांतिकारी भिमाबाई होळकर आठवत नाहीत. भिमाबाई कोण होत्या हेही आम्हाला माहित नाही. आणि जे माहित आहे ते चुकीचे माहित आहे. खंडेराव, मालेराव, यशवंतराव सारेच कसे काय माथेफिरू ठरतात ? आणि माथेफिरू असूनही आभाळालाही लाजवेल असे कर्तुत्व या महामानवानी गाजवले कसे ? हा प्रश्न आम्हाला पडला पाहिजे.

यापुढील काळात इतिहास लिहिताना या उपेक्षित क्रांतीकारी, बहुजन नायकांना न्याय देण्याचा प्रयत्न शिक्षित आणि जागृत बहुजन समाजाने केला पाहिजे. होळकर घराण्यातील कर्तुत्ववान पुरुष आणि स्त्रियांची खूप उपेक्षा झाली आहे. त्यांच्यावर इतिहास लेखकांनी आणि समाजाने अन्यायच केला आहे. त्यांचे वारसदार म्हणून नाव संगणारे आपण त्यांच्यावरील बदनामीचे कलंक पुसून टाकण्यासाठी प्रयत्न करत नाही हे दुर्दैव आहे. सध्या या बाबतीत एक उत्कृष्ट म्हणावा असा प्रयत्न जेष्ठ लेखक संजय सोनवणी यांनी केला आहे. भारतीय इतिहासातील एक अजरामर व्यक्तिरेखा असणारे यशवंतराव होळकर यांचे चरित्र सोनवणी यांनी रेखाटले आहे. यशवंतरावांचे चरित्र लिहीत असताना सोनवणी यांच्यासमोर काही प्रमुख अडचणी होत्या. आजपर्यंत यशवंतराव होळकर या माणसाचे जे चरित्र आपणाला माहित आहे ते म्हणजे लुटारू आणि पुणे जाळणारा यशवंतराव. पुण्याशी असणारे यशवंतरावांचे हे वैर सर्वज्ञात आहे. परंतु त्यामागील नेमकी कारणमिमांसा सोनवणी यांनी केली आहे. यशवंतराव यांच्यावर जो पुणे जाळल्याचा आरोप केला जातो तो धादांत खोटा आहे हे सोनवणी यांनी ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे सिद्ध केले आहे. पुणे जाळणे तर दूरच, सामान्य माणसाला कोणताही त्रास होता कामा नये असा आदेशच यशवंतराव यांनी काढला होता. पुणे युद्धाच्या दरम्यान शिंदे यांच्या एका सरदाराचा वाडा जाळण्यात आला होता. याव्यतिरिक्त पुणे जाळले हा अपप्रचार आहे हे सोनवणी यांनी पुरावे देवून मांडले आहे. यशवंतराव होळकर हे राजे बनायला सर्व बाजूंनी समर्थ असतानाही त्यांना सत्तेची कोणतीही लालसा नाही हे यशवंतरावांचे चरित्र वाचताना पदोपदी जाणवते. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत होळकर संस्थानाची विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्याचे श्रेय यशवंतराव होळकर यानांच जाते. 

यशवंतराव हे मल्हारराव होळकर यांचे दत्तकपुत्र तुकोजीराव यांचे धाकटे पुत्र. त्यांचे मोठे बंधू विठोजीराव यांना पुण्यात हत्तीच्या पायाशी देवून ठार मारले. अतिशय क्रूरपणे केलेल्या विठोजीच्या हत्येला पुणेकर साक्षी होते. विठोजी होळकर यांचा काहीएक अपराध नसताना सत्तेच्या नशेत धुंद असणाऱ्या बाजीराव आणि त्याच्या साथीदारांनी विठोजीच्या हत्येचे फर्मान काढले. विठोजीला अपमानित करत साखळदंडांनी बांधून हत्तीच्या पायाशी सोडण्यात आले. पिसाळलेल्या हत्तीने विठोजीचा चेंदामेंदा करून टाकला. मानवतेला लाजवणारे हे कृत्य पुण्यनगरीत घडले. कोणाच्याही तोंडातून ब्र बाहेर पडला नाही. विठोजीच्या हत्येचा पुण्यात निषेध झालाच नाही. विठोजीच्या हत्येची बातमी यशवंतरावाला समजली आणि भावाच्या हत्येच्या बातमीने तो पेटून उठला. बाजीरावाची आणि त्याच्या साथीदारांची सत्तेची नशा उतरवण्यासाठी यशवंतराव पुण्यावर चालून आले. भ्याड बाजीराव पुणे सोडून पळून गेला. विठोजीच्या हत्येनंतर खरेतर यशवंतराव फार दुःखी झाले होते. तरीही त्यांनी बाजीरावाशी बोलणी करण्याची तयारी केली. परंतु यशवंतराव आपणाला जिवंत सोडणार नाही असे वाटल्याने चर्चेची सारी निमंत्रणे धुडकावून बाजीरावाने पलायन केले. पुण्याच्या जनतेला वाऱ्यावर सोडून पळालेला बाजीराव इतिहासात खलनायक ठरत नाही, मात्र पुण्यातील सामान्य जनतेला कोणीही धक्का लावता कामा नये असा आदेश आपल्या सैन्याला देणारा, पदोपदी अपमान, अन्याय सहन करून या राष्ट्रासाठी, राष्ट्रातील सामान्य जनतेसाठी नेहमी चर्चेची तयारी ठेवणारा यशवंतराव खलनायक ठरला. इतका कि सकाळी उठल्यानंतर यशवंतरावाचे नावही घेवू नये असा प्रघात पडण्याइतपत. पुण्यावर होळकरी आली होती, म्हणजे यशवंतरावांनी पुणे बेचिराख करून टाकले अशी मांडणी केली गेली. पुणेकर यशवंतरावाविरुद्ध केलेल्या या अपप्रचाराला बळी पडले. अनेक वर्तमानपत्रे आजही हाच खोटा इतिहास प्रमाण मानून लेखन करत आहेत. 

नतद्रष्ट इतिहास लेखक आणि त्यांच्यावर आंधळा विश्वास ठेवणारे लोक यांनी जरी यशवंतरावाच्या स्मृतीना करपू दिले तरीही काही लोकांनी खरे यशवंतराव समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न नेहमी केला आहे. शाहीर अमर शेख म्हणतात,
" शिवराया मागं होळकर फक्त ऐकला
महाराष्ट्रध्वजा अति उंच उभारुनी गेला
नव इतिहासाचा नवा सत्य दाखला
अमरनें दिला ! मुजऱ्याला चला...
यशवंतराव होळकर बोला,
चांगभल बोला !!!!! "  

आजपर्यंत यशवंतरावाचे, त्यांच्या कार्यकर्तुत्वाचे निपक्षपाती मूल्यमापन क्वचितच झाले आहे. यशवंतराव होळकर हे भारतीय भूमीत जन्माला आलेला एक हिरा आहे. आजपर्यंत या हिऱ्यावर उपेक्षेची, जातीद्वेषाची राख जमा झाली होती. ही राख झटकून यशवंतरावांचे खरे आणि निर्मळ चरित्र समाजासमोर आले पाहिजे. ऐतिहासिक पुरावे, कागदपत्रांच्या आधारे खऱ्या इतिहासाची मांडणी झाली पाहिजे. हे शिवधनुष्य पेलण्याचे आव्हान बहुजन समाजाने स्वीकारले पाहिजे. अन्यथा त्यांच्या थोर महापुरुषांचा इतिहास असाच कलंकित केला जाणार. या पक्षपाती इतिहासाला नतदृष्ट इतिहासकार जेवढे जबाबदार आहेत तेवढेच आपणही जबाबदार आहोत. आपण कधी खऱ्या इतिहासाची आस धरली नाही हा आपला गुन्हा आहे. इथून पुढील काळात बुद्धीजीवी वर्गावर खरा आणि निपक्षपाती इतिहास लिहिण्याची जबाबदारी आहे. तो जर आप लिहिणार नसू तर भावी काळात आमच्या महापुरुषांना बदनाम केले म्हणून प्रस्थापित वर्गाच्या नावाने खडे फोडण्याचाही आपणाला अधिकार नसेल.

अधिक माहितीसाठी वाचा – 

अखेरचा सार्वभौम राजा : महाराजा यशवंतराव होळकर

महाराज यशवंतराव होळकर - यशवंत नायक मासिक

अखेरचा सार्वभौम महाराजा यशवंतराव होळकर

यशवंतराव होळकरांनी पुणे ना जाळले ना लुटले...

विठोजीची क्रुरातिक्रुर हत्या...

अखेरचा सार्वभौम महाराजा यशवंतराव होळकर

वैदिक राज्याभिषेक करुन घेणारे स्वतंत्र सार्वभौम राज्याचे निर्माते यशवंतराव होळकर

वैदिक राज्याभिषेक करुन घेणारे  स्वतंत्र सार्वभौम राज्याचे निर्माते यशवंतराव होळकर 
या राज्याभिषेकाची एक पार्श्‍वभूमी आहे. तुकोजीराजे होळकर यांच्या मृत्युनंतर इंदूरची गादी काशीराव या त्यांच्या ज्येष्ठ पुत्राला देण्याचा घाट दुसरे बाजीराव व दौलतराव शिंदे यांनी घातला होता. पण काशीराव हे एक तर अत्यंत अकार्यक्षम तर होतेच पण अधुही होते. पण त्यामुळे होळकरांची संस्थाने आपल्याला गिळंकृत करता येतील असा दौलतरावांचा होरा होता. यासाठी शिंद्यांनी खरा लायक वारसदार म्हणता येईल अशा दुस-या मल्हाररावांचा पुण्यात खून केला आणि विठोजी व यशवंतराव या कनिष्ठ बंधुंना जीव वाचवण्यासाठी पलायन करावे लागले. 
यानंतर शिंद्यांनी संपूर्ण होळकरी प्रांत घशात घातला व तेथे चिवेलियर डंडरनेक या फ़्रेंच सेनानीची नियुक्ती केली. दौलतरावांनी संपूर्ण उत्तरेसाठी जनरल पेरों या सेनानीची नियुक्ती केली होती तर डंडरनेक हा त्याच्याच अधिपत्याखाली इंदूरमध्ये ठाण मांडून बसला होता. अशा प्रकारे होळकरी संस्थाने पूर्णतया शिंद्यांच्या ताब्यात गेली होती. होळकरांचा सर्वच वारसा नाकारला गेला होता. पण यशवंतराव होळकरांनी खान्देशातील भिल्ल आणि पेंढार्‍यांच्या स्वतंत्र पलटनी उभारुन आपले परंपरागत राज्य प्राप्त करण्यासाठी संघर्ष सुरु केला. शिंद्यांच्या लष्कराशी अनेक लढाया करत त्यांनी एकेक महाल मुक्त करायला सुरुवात केली. शेवटी त्यांनी महेश्‍वरवर चाल केली. तेथे डंडरनेकच्या सैन्याचा त्यांनी गनिमी काव्याने घनाघाती प्रहार करत पराभव केला. डंडरनेकचे कवायती सैन्य होते सहा हजार घोडदळ तर दहा हजार प्रशिक्षित पायदळ. यशवंतरावांकडे फक्त दोन हजार घोडदळ होते तर पाच हजार पायदळ. तोफ एकही नाही तर डंडरनेककडे ६0 तोफा होत्या. परंतु त्यांनी डंडरनेकचा सपशेल पराभव केला. शेवटी स्वत डंडरनेक शिंद्यांची सेवा सोडून यशवंतरावांच्या सैन्यात सामील झाला. ही घटना घडली डिसेंबर १७९८ मध्ये.
तत्कालीन स्थितीत राज्य जिंकले असले तरी जनमान्यतेसाठी एकतर पातशाही मान्यता लागे किंवा मराठा राजमंडळाचा सदस्य व्हायचे असेल तर पेशव्यांची. पेशव्यांविरुद्धच बंड करुन स्वतंत्र राज्य निर्माण केले असल्याने पेशवे तशी मान्यता, विनंत्या करुनही, देणे शक्यच नव्हते. शिंदे तर या मानहानीमुळे सुडसंतप्त झाले होते. (त्याचीच परिणती विठोजींच्या क्रूर हत्येत झाली.) यशवंतराव होळकर हे अनौरस आहेत असा प्रवाद तेंव्हा असल्याने पातशहाही त्यांना (जशी पेशव्यांना देत असे) तशी वस्त्रे यशवंतरावांना देणे शक्य नव्हते.
अशा स्थितीत सार्वभौम राजा होण्यासाठी, खरे तर ज्या तत्कालीन कारणांमुळे शिवरायांनाही राज्याभिषेक करुन घ्यावा लागला, त्याच कारणांमुळे यशवंतराव होळकरांनी ६ जानेवारी १७९९ रोजी वैदिक पद्धतीने राज्याभिषेक करुन घेतला. स्वत:चे राजचिन्ह आणि मुद्रा घोषित केली.
विस्मृतीत गेलेला पण इतिहासातील मोलाची घटना असलेला होळकरांचा राज्याभिषेक सोहळा यंदापासून मोठ्या प्रमाणावर त्यांचे जन्मस्थान, वाफगांव (ता. राजगुरुनगर) येथील किल्ल्यावर साजरा करण्यात येणार आहे. प्रत्येक मराठी माणसाचा अभिमानाने उर भरुन यावा अशा घटनेचा उत्सव साजरा व्हायलाच हवा!
- संजय सोनवणी